बातम्या

म्हैशाळ बॅरेजच्या कामाचे कनवाड हद्दीतील भूसंपादन पाटबंधारे विभागाने पूर्ण करावे* 

Maishal barej


By nisha patil - 5/15/2026 9:08:06 PM
Share This News:



*म्हैशाळ बॅरेजच्या कामाचे कनवाड हद्दीतील भूसंपादन पाटबंधारे विभागाने पूर्ण करावे* 

. गेली तीन वर्षापासून कृष्णा नदीवर कनवाड म्हैसाळ दरम्यान पाटबंधारे विभागाकडून बैरेजचे बांधकाम सुरू आहे. सदरच्या बॅरेजच्या बांधकामासाठी आणि पोच रस्त्यासाठी कनवाड हद्दीतील जमिनीचे भूसंपादन होणे गरजेचे आहे .

यापूर्वी शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे व महसूल विभागाकडे वेळोवेळी निवेदन द्वारे मागणी करण्यात आलेली होती. 

त्याबाबत माननीय तहसीलदारसो शिरोळ यांच्या 23 /4 /2026 रोजी मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये ठरले प्रमाणे एक महिन्याच्या आत सदर भूसंपादनाची मोजणी होऊन शेतकरी निहाय मोबदला ठरवण्यासाठी भूसंपादन समितीकडे प्रस्ताव पाठवायचे ठरले होते .पण अद्यापही अजून योग्य ती कार्यवाही झाली नाही.फक्त मोजणी होऊन नकाशा झालेला आहे पण भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करून तो मोबदला ठरवण्यासाठी भूसंपादन समितीकडे देणे गरजेचे आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून भूसंपादन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा.यासाठी कार्यकारी अभियंता म्हैसाळ ताकारी उपसा सिंचन विभाग व तहसीलदारसो शिरोळ यांना हे सर्व निवेदन देऊन तशी मागणी करण्यात आली तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी बॅरेजच्या बांधकामासाठी म्हैशाळ हद्दीत घातलेला मातीचा बांध पंधरा दिवसांमध्ये काढावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा सुद्धा देण्यात आला.

 यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, गोपाल चव्हाण ,वाजीद इनामदार ,संभाजी जाधव, सरफराज इनामदार, अरुण खाडे, रफीक इनामदार, उत्तम हिंगमिरे ,पिंटू खाडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.


म्हैशाळ बॅरेजच्या कामाचे कनवाड हद्दीतील भूसंपादन पाटबंधारे विभागाने पूर्ण करावे* 
Total Views: 7