बातम्या

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! CJP चे अध्यक्ष अभिजीत दिपके विमानातूनच ताब्यात!

Major action by Delhi Police


By nisha patil - 10/10/2026 3:23:48 PM
Share This News:



दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! CJP चे अध्यक्ष अभिजीत दिपके विमानातूनच ताब्यात!

 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला दिल्ली पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉकरोच जनता पार्टी  आणि काही विद्यार्थी संघटनांनी आज, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला.

दरम्यान, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी सौरव दास व आशुतोष रांका यांना पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना विमानातून उतरूही दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके याने, अरे सर, मी इथे अरेस्ट होण्यासाठीच आलोय, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे या कारवाईची आणि त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे


दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! CJP चे अध्यक्ष अभिजीत दिपके विमानातूनच ताब्यात!
Total Views: 16