बातम्या
कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई : आंबा घाट मार्गे येणारा एक कोटी 77 लाखांचा दारूचा साठा जप्त
By nisha patil - 8/27/2025 4:05:04 PM
Share This News:
कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई : आंबा घाट मार्गे येणारा एक कोटी 77 लाखांचा दारूचा साठा जप्त
कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी रात्री मोठी कारवाई करत गोवा बनावटीची दारू वाहून नेणारा ट्रक पन्हाळा रोडवरील पडवळवाडी येथे सापळा रचून पकडला. या ट्रकमधून तब्बल एक कोटी 47 लाख 84 हजार रुपयांची दारू मिळून आली असून, ट्रकसह एकूण एक कोटी 77 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही बेकायदेशीर वाहतूक आंबा घाट मार्गे केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने ही कारवाई केली. ट्रक क्रमांक एमएच-12 वीटी-7403 अडवून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे चवदार शेख बॉक्स आढळले.
दारूची वाहतूक करणारे शैलेश जयवंत जाधव (वय 36, रा. कचेरी गल्ली, इस्लामपूर) व त्याचा सहकारी वासुदेव केशवराज मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, या दोघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे, सहाय्यक निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे व कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, मारुती पवार, विशाल आळंदीकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे यांच्या पथकाने केली.
कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई : आंबा घाट मार्गे येणारा एक कोटी 77 लाखांचा दारूचा साठा जप्त
|