बातम्या
महायुतीला मोठा दिलासा! मंगेश चिवटेंची माघार; कौस्तुभ गावडेंचा मार्ग मोकळा!
By nisha patil - 9/10/2026 7:35:13 PM
Share This News:
महायुतीला मोठा दिलासा! मंगेश चिवटेंची माघार; कौस्तुभ गावडेंचा मार्ग मोकळा!
पुणे शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली असून, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर चिवटे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाने मंगेश चिवटे यांना मैदानात उतरवल्याने महायुतीसमोरच आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दरम्यान, चिवटे यांच्या माघारीमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीतील उमेदवारीचा पेच संपुष्टात आला असून, भाजपचे कौस्तुभ गावडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील. आता या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुतीला मोठा दिलासा! मंगेश चिवटेंची माघार; कौस्तुभ गावडेंचा मार्ग मोकळा!
|