ताज्या बातम्या

मकर संक्रांतीचा सण : विश्वासराव नाईक साखर कारखान्यात तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम

Makar Sankranti Festival Tilgul distribution program at Vishwasrao Naik Sugar Factory


By nisha patil - 1/14/2026 4:41:07 PM
Share This News:



चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज (ता. १४) मकर संक्रांती निमित्त तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्यासह संचालक मंडळाने तिळगूळ वाटप केले.

यावेळी संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, बिरुदेव आमरे, सुरेश पाटील, यशवंत निकम, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, संदीप तडाखे, आनंदा पाटील, तुकाराम पाटील, यशवंत दळवी, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना तिळगूळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.


मकर संक्रांतीचा सण : विश्वासराव नाईक साखर कारखान्यात तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम
Total Views: 44