बातम्या

जनतेच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीला विजयी करा 

Make Mahavikas Aghadi victorious for the peoples issues


By Administrator - 1/31/2026 6:09:28 PM
Share This News:



जनतेच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीला विजयी करा 
 

शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड)/ता.३१ महागाईने जनता होरपळत आहे. स्मार्ट मीटर,शक्ती पीठ यामुळे शेतकऱ्यांचे तसेच जनतेचे नुकसान होत आहे.महागाई वाढली असल्याने लाडक्या बहिणींना संसाराचा गाडा हाकताना त्यांचा जीव मेटाकुटीला आला असून या चुकीच्या कारभाराला चाप लावायचा असेल तर महाविकास  आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले 
   

शिरढोण (ता.शिरोळ) येथे महाविकास आघाडीचे यड्राव जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ. अर्चना अमोल चौगुले(काँग्रेस) व शिरढोण पंचायत समितीचे उमेदवार सौ.सायली विवेक मालगावे(काँग्रेस )आणि यड्राव पंचायत समितीचे उमेदवार सतीश प्रभावळकर(उबाठा) यांच्या प्रचार सभेच्या कार्यक्रमात आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील बोलत होते.आमदार पाटील पुढे म्हणाले जनता आमच्याबरोबर असून जनता हीच आमची ताकद आहे. संघर्ष करणाऱ्याच्या पाठीमागे लोक राहतात. संघर्षाला ताकद देण्याची आता आपली जबाबदारी असून लोकांसाठी राबणाऱ्याला व जनतेच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या महाविकासाठीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी शिवनाकवाडीचे माजी सरपंच गणपती कृष्णा उमराणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिला
       

प्रारंभी स्वागत अमोल चौगुले यांनी केले.यावेळी गणपतराव पाटील, शिरोळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिरोळ तालुका काँगेस अध्यक्ष दरगू गावडे,शेखर पाटील, टाकवडे सरपंच  सविता चौगुले, उपसरपंच शिवानंद कोरबू, सुहेल बानदार, कल्लाप्पा टाकवडे, महादेव पानदारे, अभय भोसले,अरुण शिंगे,मोरा भंडारे, संजय पाणदारे, रामचंद्र कांबळे, एकनाथ माळकरी, अस्लम मुजावर, शाहीर बानदार, चंद्रकांत मालेगावे,विवेक मालगावे आदी उपस्थित होते.आभार राजेखान नदाफ यांनी मानले


जनतेच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीला विजयी करा 
Total Views: 273