राजकीय
शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा
By Administrator - 1/29/2026 6:29:59 PM
Share This News:
शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा
शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड) :- खासदार व आमदार हे एकाच विचाराचे असून शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यड्राव जिल्हा परिषद व शिरढोण पंचायत समिती मतदार संघातील राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून खऱ्या अर्थाने विकासाला गती द्यावी असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले
शिरढोण(ता.शिरोळ) येथे महायुती पुरस्कृत राजश्री शाहू विकास आघाडीचे यड्राव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार सौ रंजना सूर्यकांत कोळी व शिरढोण पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सौ. मनीषा रणजीत कदम यांच्या प्रचार सभेच्या कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. आमदार यड्रावकर पुढे म्हणाले आम्ही नेहमी विकासात्मक व स्पर्धात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्यासाठी आपल्या विचाराचे जिल्हा परिषदचे उमेदवार रंजना कोळी व पंचायत समितीचे उमेदवार मनीषा कदम यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, चंद्रकांत मोरे, शक्ती पाटील, शाबुद्दीन टाकवडे,रणजित कदम,रंजना कोळी, मनिषा कदम, माजी जि.प.सदस्य विकास कांबळे यांची भाषणे झाली.याप्रसंगी बाबुराव कोईक, विजय खंजीरे, कल्लाप्पा कोईक दादासो चौगुले, भास्कर कुंभार, शशिकांत चौधरी, प्रकाश चौगुले, दिलीप पाटील, बापूसो मालगावे, नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय आलासे, जय कडाळे, विश्वास बालिघाटे, सूर्यकांत कोळी, महावीर नारगुडे, सचिन मालगावें, विलास चौगुले, रुपचंद शिंदे,राजू हसुरे, आदिनाथ हळूरे, किरण कोईक,सचिन कोईक, प्रमोद कांबळे,तन्वीर मुजावर, महंमद मुजावर,मुसा मुजावर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विपुल कांबळे यांनी केले
शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा
|