बातम्या
सामान्य माणसांचे अश्रू पुसणाऱ्या राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा
By nisha patil - 11/29/2025 3:29:04 PM
Share This News:
सामान्य माणसांचे अश्रू पुसणाऱ्या राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा
चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजर्षी शाहू आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद काणेकर आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उपस्थित राहिलो. माजी आमदार राजेश पाटील यावेळी उपस्थित होते.
चंदगडमधील गरिब आणि सामान्य माणसाचे अश्रू पुसणारी माणसं निवडून आली पाहीजेत. राजर्षी शाहू आघाडीचे सर्व उमेदवार हे चंदगडकरांच्या मदतीला आणि सहकार्याला धावून येणारे लोक आहेत. त्यामुळे मतदानादिवशी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूया असे आवाहन यावेळी मतदारांना केले.
यावेळी नंदाताई बाभुळकर, जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, रामराजे कुपेकर, जे. बी. पाटील, विक्रम चव्हाण-पाटील, विलास पाटील, एम. जी. पाटील, विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई, प्रशांत देसाई यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामान्य माणसांचे अश्रू पुसणाऱ्या राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा
|