विशेष बातम्या
अंशकालीन पोलीस सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा..
By nisha patil - 12/15/2025 4:00:46 PM
Share This News:
अंशकालीन पोलीस सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा..
G.R. रखडला; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा
राज्यातील पोलीस ठाण्यांतील अंशकालीन रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून किमान वेतन व थकबाकी देण्याबाबत तातडीने G.R. काढावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी सफाई संघटनेने केली आहे.
दि. ०७ ऑगस्ट २०२५ रोजी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय झाला असतानाही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संजय माने यांनी दिला आहे.
अंशकालीन पोलीस सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा..
|