बातम्या
आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 5/27/2025 4:22:13 PM
Share This News:
आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. 27 : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढत असून संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी चोख तयारीचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत रेड अलर्ट जारी असून, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत महापालिका, जलपुरवठा, आरोग्य, वाहतूक आणि स्थलांतरण व्यवस्थेबाबत तपशीलवार चर्चा झाली. नालेसफाई, नदीपात्रातील अतिक्रमणे, गटार सफाई, पूरनिवारा केंद्रांचे नियोजन, पाण्याचा टंचाई टाळण्यासाठी टँकर सेवा, तसेच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण आणि आरोग्य सुविधांची तयारी यावर भर देण्यात आला.
शहर परिसरात पाणी साचू नये यासाठी नाल्यांतील गाळ तात्काळ काढण्याच्या, आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांवर उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|