बातम्या
कागलच्या देश पातळीवरील स्मार्ट सिटी नावलौकिककासाठी आघाडीला विजयी करा - राजे समरजितसिंह घाटगे
By nisha patil - 11/28/2025 5:29:51 PM
Share This News:
कागलच्या देश पातळीवरील स्मार्ट सिटी नावलौकिककासाठी आघाडीला विजयी करा - राजे समरजितसिंह घाटगे
कागल प्रतिनिधी नागरी भागात रस्ते व गटरच्या पलीकडे जाऊन केंद्र व राज्य सरकार विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे.हा निधी मोठ्या प्रमाणात खेचून आणून या योजना प्रभावीपणे राबवून कागलचा स्मार्ट सिटी असा देश पातळीवर नावलौकिक करण्यासाठी राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ अनंत रोटो परिसरात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ व माझ्या माध्यमातून कागल शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. विस्तारणारे नागरिकीकरण व नागरिकांच्या काळानुसार वाढत जाणाऱ्या अपेक्षा व मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही संयुक्तपणे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्र सरकार मधील दोघांचा असलेला संपर्क या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे शक्य होणार आहे. स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांचे पारदर्शक कारभार, कल्पकता व योग्य नियोजनामुळे शाहू ग्रुपच्या माध्यमातून सहकारात कागलचा देश पातळीवर नावलौकिक झाला.त्यांच्या या विचारधारेचे केवळ कागल नगरपालिकेत नव्हे तर संपूर्ण कागल तालुक्यात काम करत असताना आम्ही अनुकरण करणार आहोत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,अनंत रोटो परिसर हा शहराच्या उपनगराचा भाग आहे. या परिसरात कोट्यावधी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला आहे.अपूर्ण असलेल्या सोयी सुविधांसह येथील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर मार्गी लावू.
यावेळी उमेदवार रजिया मुजावर, बाळासो माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कागलच्या विकासाला गती मिळणार- अखिलेशराजे घाटगे
यावेळी बोलताना अखिलेशराजे घाटगे म्हणाले, दोन प्रबळ गट एकत्र आले आहेत म्हणून कार्यकर्त्यांनी निवडणूक हलक्यात घेऊ नये. निवडणूक म्हणून जे नियोजन करावे लागते ते काटपोरपणे शेवटच्या क्षणापर्यंत करावे.कागलच्या विकासासाठी मंत्रि मुश्रीफ व राजे समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यामुळे आता कागलच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळून गती मिळणार आहे.
कागलच्या देश पातळीवरील स्मार्ट सिटी नावलौकिककासाठी आघाडीला विजयी करा - राजे समरजितसिंह घाटगे
|