राजकीय

100 कोटींच्या रस्त्यांचा लेखापरीक्षण अहवाल जनतेसाठी 15 दिवसात खुला करा :

Make the audit report of roads worth Rs 100 crores


By nisha patil - 4/12/2025 11:09:02 AM
Share This News:



 कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनी आयुक्तांना निवेदन देत 100 कोटींच्या आणि मागील चार वर्षांतील 25 लाखांवरील सर्व रस्त्यांच्या कामांचे CRRI किंवा IIT मुंबईमार्फत स्वतंत्र तांत्रिक-आर्थिक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली.
महायूतीतील एका आमदारानेच “इतके खाऊ नका की पोट फुटेल” असे वक्तव्य करून रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे जणू मान्यच केले असल्याचं वक्तव्य माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी केले.

निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर केवळ ब्लॅकलिस्ट न करता कायद्याने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या निवेदनावेळी दुर्वास कदम, तौफिक मुलाणी, महेश जाधव, राजेंद्र साबळे, धनंजय सावंत, अमर समर्थ, भारती पवार, विजय फाळके, संजय पटकारे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.


100 कोटींच्या रस्त्यांचा लेखापरीक्षण अहवाल जनतेसाठी 15 दिवसात खुला करा :
Total Views: 16