बातम्या
पुस्तकाचे कपाट आंदण द्या – समाज प्रगतीपथावर जाईल” – डॉ. जयसिंगराव पवार यांचा संदेश
By nisha patil - 1/7/2025 4:53:54 PM
Share This News:
पुस्तकाचे कपाट आंदण द्या – समाज प्रगतीपथावर जाईल” – डॉ. जयसिंगराव पवार यांचा संदेश
१२ शिक्षकांचा ‘शाहू पुरस्कार’ देऊन गौरव, ७ हजार विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा जाहीर
शाहू छत्रपती फौंडेशनतर्फे शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवनात पार पडला. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी समाजप्रबोधनपर भाषणात लग्नात पुस्तकाच्या कपाटाची आंदण प्रथा सुरु करण्याची गरज मांडली. तसेच आचारवंतांची आवश्यकता असल्यावर भर दिला.
या कार्यक्रमात श्रीराम साळुंखे, हणमंत बागल, संदीप आडनाईक, आनंदराव भोसले यांच्यासह १२ शिक्षकांना ‘शाहू आदर्श शिक्षक’ व ‘विशेष उल्लेखनीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. पुढील वर्षांपासून राज्यभरातील ७ हजार विद्यार्थी ‘राजर्षी शाहू विचार प्रसार परीक्षा’त सहभागी होणार असल्याची घोषणाही झाली.
पुस्तकाचे कपाट आंदण द्या – समाज प्रगतीपथावर जाईल” – डॉ. जयसिंगराव पवार यांचा संदेश
|