बातम्या
बाजारपेठ मुख्यरस्ता त्वरित करा.-बांधकाम विभागास व्यापारी असोसिएशनचे निवेदन
By nisha patil - 12/3/2026 11:05:46 PM
Share This News:
बाजारपेठ मुख्यरस्ता त्वरित करा.-बांधकाम विभागास व्यापारी असोसिएशनचे निवेदन
आजरा (हसन तकीलदार ):-छत्रपती संभाजी चौक ते महादेव मंदिर सोमवार पेठ पर्यंतचा रस्ता मंजूर होऊनसुद्धा का केला जात नाही यामागचे गुपित उघड होई ना. हे एक गुढच बनले आहे. धुळीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत याअगोदर व्यापारी असोसिएशनने नगरपंचायतीला निवेदन देऊन रस्ता करण्याची मागणी केली होती. दोन महिने झाले तरी अजून रस्त्याचे काम सुरु झाले नसल्याने व्यापारी असोसिएशनने बांधकाम विभागाचे उपाभियंता ए. एस. कचरे यांना रस्ता त्वरित करणेबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या बऱ्याच दिवसापासून आजरा शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यामध्ये पाईप लाईन, गटर, विविध प्रकारच्या केबल टाकणे आणि अन्य कारणासाठी संपूर्ण बाजारपेठ रस्ता खुदाई केल्याने धुळीचे प्रमाण खूपच वाढले आहे. याचाच परिणाम सर्व दुकानदारांच्या आरोग्यावर होत असून दुकानातील वस्तूवर सुद्धा परिणाम होत आहे त्यामुळे गिऱ्हाईक वस्तू खरेदी करताना टाळाटाळ करीत आहेत. परिणामी दुकानातील वस्तूंचे नुकसान होत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी चौक ते सोमवार पेठ रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे.
हा रस्ता मंजूर असूनसुद्धा त्याचप्रमाणे मागील दोन महिन्यापासून व्यापारी असोसिएशन याबाबत पाठपुरावा करुनसुद्धा या रस्त्याचे काम का खोळंबळे आहे हेच गूढ उकलत नाही. लवकरात लवकर जर या रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर तिव्र आंदोलन छेडणार असलेबाबत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर यांनी सांगितले. हे निवेदन म्हणजे पूर्व सूचना आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वाय. जी. इंजल, राजा विभुते, अभिजित रांगणेकर, अनिल पाटील, निलेश घाटगे आदिजण उपस्थित होते.
बाजारपेठ मुख्यरस्ता त्वरित करा.-बांधकाम विभागास व्यापारी असोसिएशनचे निवेदन
|