बातम्या

गोवर व रूबेला लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Make the measles and rubella vaccination campaign


By nisha patil - 9/9/2025 4:46:46 PM
Share This News:



गोवर व रूबेला लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील 4 हजार 265 बालकांना मोहिमेद्वारे लसीकरण

कोल्हापूर, दि. 9 : जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांमधील 4 हजार 265 बालकांना गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेतून कव्हर करण्यात येणार आहे. 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान ही मोहीम राबवली जाणार असून तिचे शंभर टक्के यश सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक तसेच शिक्षण, समाजकल्याण, आदिवासी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व आश्रमशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये अलीकडेच गोवरचे रुग्ण आढळून आल्याने ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच ते पंधरा वयोगटातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मुलांना लस दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक आश्रमशाळा व मदरशात आरोग्य विभागामार्फत लसीकरण सत्र आयोजित केले जाणार असून विशेष लसीकरण चमूची स्थापना केली जाणार आहे.

प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांची ऑनलाइन कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. काही शाळांना नवरात्रीनिमित्त सुट्टी असल्यास तेथील सर्व मुलांना लसीकरण मिळेल याची विशेष काळजी घेण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


गोवर व रूबेला लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
Total Views: 426