बातम्या
मालेगाव बॉम्बस्फोट खटला: संघाला गोवण्याचा काँग्रेसचा डाव निष्फळ
By nisha patil - 6/8/2025 5:01:56 PM
Share This News:
मालेगाव बॉम्बस्फोट खटला: संघाला गोवण्याचा काँग्रेसचा डाव निष्फळ
२००८ साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व ७ आरोपींना ३१ जुलै २०२५ रोजी न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश होता.
या खटल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस अधिकारी मेहमूद मुजावर यांनीच तपासात संघाच्या वरिष्ठांना गोवण्याचा दबाव होता, असा खुलासा केला. त्याचप्रमाणे साध्वी आणि कर्नल यांनी न्यायालयात दिलेल्या निवेदनांत तपास यंत्रणेकडून छळ, मारहाण, आणि जबरदस्तीने संघ व भाजप नेत्यांची नावे घेण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून 'भगवा दहशतवाद' व 'हिंदू दहशतवाद' या शब्दप्रयोगांचा हेतुपुरस्सर वापर करून संघ आणि हिंदुत्ववादी विचारधारेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. मात्र १७ वर्षे चाललेल्या खटल्यातील निर्णय आणि साक्षीदारांचे गौप्यस्फोट पाहता काँग्रेसचा हा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटला: संघाला गोवण्याचा काँग्रेसचा डाव निष्फळ
|