बातम्या

मलिग्रे येथे जिल्हास्तरीय समिती कडून समाधान व्यक्त

Malegre1


By nisha patil - 4/6/2026 11:13:56 PM
Share This News:



**मलिग्रे येथे जिल्हास्तरीय समिती कडून समाधान व्यक्त*

**आजरा(हसन तकीलदार)*:- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणीसाठी लातूर जिल्हा परीषद मुल्यांकन समिती कडून मलिग्रे ता. आजरा येथे भेट देऊन केलेल्या उपक्रमाचे कौतुक व समाधान व्यक्त केले. स्वागत प्रशासक शारदा गुरव यांनी केले.

  यामध्ये घरकुल, पाणंद रस्ते, स्मशानशेड, मराठी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वृक्षारोपण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, सिसिटिव्ही, इत्यादी उपक्रमांची व दप्तर तपासणी प्रकल्प संचालक समिती प्रमुख संजय इंगळे जिल्हापरिषद लातूर, बालाजी पोतदार, बाळकृष्ण बंडे (RGSY ) यानी प्रत्यक्ष पहाणी करून केलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य समिर पारदे, आजरा गटविकास अधिकारी सुभाष सावंत, बाबासाहेब कुंभार,जे. एस. बोकडे, उपसरपंच चाळू केंगारे, राजाराम नावलगी, शोभा जाधव, कल्पना बुगडे ग्रामपंचायत सदस्या , संस्थेचे पदाधिकारी, तरूण मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते आभार ग्रामपंचायत अधिकारी धनाजी पाटील यानी मानले.


मलिग्रे येथे जिल्हास्तरीय समिती कडून समाधान व्यक्त
Total Views: 472