बातम्या
मलिग्रे भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात संपन्न
By nisha patil - 9/5/2026 12:30:21 PM
Share This News:
मलिग्रे भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात संपन्न
आजरा (हसन तकीलदार) : मलिग्रे- कागीणवाडी येथील ग्रामस्थ व भक्तांच्या आर्थिक, श्रमिक आणि वैचारिक सहकार्यांतून उभारण्यात आलेल्या भव्य भावेश्वरी देवी मंदिराचा वास्तुशांती, कलशारोहण व विविध धार्मिक विधींचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मलिग्रे गावचे आराध्य दैवत भावेश्वरी देवीच्या मंदिर वास्तूकशांती सोहळा गुरूवार दिनांक 7 मे पासून प्रांरभ झाला असून शुक्रवारी ८ मे रोजी कलस मिरवणूक व मुर्ती मिरवणूकीत माहेर वाशीनी महिलासह संपूर्ण गावातील अबाल वृध मोठ्यासंख्यने सामिल झाल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले आहे.
गावच्या मध्यभागी असणाऱ्या चाळोबा, रवळनाथ मंदिराचा वीस वर्षापुर्वी जिर्णोध्दार झाला असून त्या मंदिरा जवळ असणाऱ्या भावेश्वरी मंदिराचा जिर्णोध्दार देणगीदार व लोक सहभागातून आकर्षक असे मंदिर बांधकाम झाले आहे. या वास्तूंशांती सोहळ्यात गावातील महिलावर्ग कलश घेऊन तर माहेरवाशीणी डुरड्याची भेट घेऊन सहभागी झाल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी मूर्ती व कलश यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.शनिवारी प्रधान देवता मुर्ती स्थापना, धार्मिक विधी पार पडले व रविवारी महाप्रसादाचे नियोजन केले आहे. आणि त्याचबरोबर सोंगी भजन व विविध कलागुणाचा सांस्कृतीक कार्यक्रम तर युवावर्गाने आणि मुंबई ग्रामस्थ वतीने किक्रेट सामन्याचेही आयोजन केले आहे.गावात अगदी उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.
मलिग्रे भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात संपन्न
|