बातम्या

मलिग्रे शाळा सर्व क्षेत्रात, ऊत्कृट असेलेचे समाधान- मनिषा सुतार

Maligre School is satisfied that it will be excellent


By nisha patil - 12/15/2025 3:50:41 PM
Share This News:



मलिग्रे शाळा सर्व क्षेत्रात, ऊत्कृट असेलेचे समाधान- मनिषा सुतार

 मलिग्रे येथील महात्मा जोतिबा फुले या नावाची प्राथमिक मराठी शाळा सर्व सोयीनीयुक्त असून, येथील पालक व ग्रामस्थ सजग, होतकरू आणि जागृत असल्याने या शाळेच्या मुलांचा बुध्यांक चांगला असलेने  व लोक सहभागातून शाळेचा परीसर व खुले पटांगण प्रेरणादायी असल्याने, ही शाळा सर्व क्षेत्रात ऊत्कृट असल्याने मत  मुख्याध्यापिका मनिषा सुतार यांनी त्याच्या बदली निमित्ताने आयोजित केलेल्या सदिच्छा समारंभात व्यक्त केले.अध्यक्ष स्थानी भाजप मुंबईचे कार्यकर्ते गणपती भणगे होते. सुरवातीला सावित्रीबाई फुले याच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
 

सुतार यांनी पुढे बोलताना म्हणाले कि, या शाळेत मी २०१८ साली हजर झाले, त्यावेळी उत्तूर मलिग्रे हे अंतर लांब असल्यामुळे सुरूवाती पासून बदलीसाठी प्रयत्न करत होते, परंतू या शाळेसाठी असणारा लोकांचा सहभाग, पालकांची तळमळ आणी सृजनशिल विध्यार्थी व शाळेचा परीसर यात असणारी आपलेपणाची भावना आणि विध्यार्थ्याचे प्रेम, आदर पाहून या शाळेत  सात वर्षे शासकीय उपक्रम व स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून तसेच कोरवी मॅडम यांच्या सहकार्याने सेवा केली. मला या गावातून खूपच प्रेरणा मिळाल्याचे त्यानी यावेळी सांगितले.  बदली निमित्ताने त्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापक कमिटी अध्यक्षा सविता कागिणकर याच्या हस्ते करण्यात आला तर नविन हजर झालेल्या शिक्षीका वैशाली जोशिलकर याचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच समीर पारदे, अशोक शिंदे, कॉ.संजय घाटगे, शिवाजी भगुत्रे, मारूती ईक्के यानीही आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर मनिषा सुतार यांनी मराठी शाळेच्या नावाचा बोर्ड, अंगणवाडीच्या मुलांना पाळणे सर्व विध्यार्थ्यांना टोप्या देणगी रूपाने देऊन, मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे,  अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे, सुनिता लोहार, पूर्वा देशपांडे, नंदा बुगडे, शितल बुगडे,शोभा बुगडे,मंगल पारदे, रेश्मा चौगुले, शिवानंद आसबे, रणजीत बुगडे, संदीप भगूत्रे, विश्वास बुगडे, बाळू कांबळे, शंकर बुगडे यांच्यासह  पालकही उपस्थिती होते. सुत्रसंचालन नुतन मुख्याध्यापीका कल्पना कोरवी यानी केले.त्याचप्रमाणे शेवटी आभारही कोरवी यांनी मानले.


मलिग्रे शाळा सर्व क्षेत्रात, ऊत्कृट असेलेचे समाधान- मनिषा सुतार
Total Views: 157