बातम्या

महात्मा फुले,मलिग्रे मराठी शाळेचे स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश

Maligre marathi school


By nisha patil - 11/5/2026 6:52:14 PM
Share This News:



**महात्मा फुले,मलिग्रे मराठी शाळेचे स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश*

**आजरा(हसन तकीलदार)*:-ग्रामिण भागातील गुणवत्ता पुर्ण जिल्हा परीषदेच्या मराठी शाळा एक नाविन्यपूर्ण वाटचाल करीत आहेत, गोरगरीब सर्वसामान्य मुलांच्यामध्ये त्यांची गुणवत्ता आणि सर्वसामान्यज्ञानाला नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांचे आयोजन केले जात आहे.

याच स्पर्धा परीक्षेमधून महात्मा जोतिबा फुले विद्यामंदीर,मलिग्रे या मराठी शाळेच्या शिक्षीका कल्पना कोरवी व वैशाली जोशीलकर यांनी विध्यार्थ्यांना ऋणानुबंध, वेध, गुरूकूल,टॅलेंटप्लस,ज्ञानोदय,मिशन, अंकूर, स्मार्ट की, एमपीएसपी अशा विविध स्पर्धा परीक्षेत विध्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करीत असल्याने, वेध परिक्षेत, आरुष राहूल धुमाळे १००% मिळवत राज्यात पहिला आला तर श्रीशा सुदाम हरेर, आरोही शिवाजी भगुत्रे, श्रावणी संतोष केंगारे या मुलीनी ९८% गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे आणि स्वरूपा संदिप देशपांडे हिला तृतीय क्रमांक मिळाला आहे.विविध स्पर्धा परीक्षेत मुलाना चांगले यश मिळाल्याने, मराठी शाळेकडे पालकांची अपेक्षा वाढली असून शिक्षक व विध्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे़. 

 खाजगी शाळेंचा झगमगाट पाहून, आणी भरमसाठ फी देऊन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराकडील शाळेत घालण्याची मानसिकता पालकांची झाली आहे.

त्यामुळे मराठी शाळा ओस पडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.तर स्थानिक पातळीवर विध्यार्थ्यांना मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मोफत मिळत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका जादा वेळ देऊन, अनंत अडचणीत मात करीत मुला मुलीना लहान पणापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहेत. शाळेच्या अभ्यासा बरोबर वकृत्व,अभिनय, गायन, संगित आणी मैदानी खेळाची मुलाना गोडी लागत असल्याने त्याच्या कलागुणाना वाव मिळत असल्याने मुख्याध्यापीका कल्पना कोरवी यांचे कौतुक होत आहे.खाजगी शाळांच्या स्पर्धेत शिक्षण तसेच इतर कलागुणांना वाव दिल्यामुळे मराठी शाळांचा दर्जा उंचावताना दिसत आहे. सरकारी शाळा टिकवणे आज काळाची गरज बनली आहे. सरकारी शाळांमुळे गोरगरीब मुलांना शिक्षण मिळते. त्यामुळे महात्मा फुले विद्या मंदिर मालिग्रे इतर मराठी शाळांना अनुकरणीय व आदर्शवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


महात्मा फुले,मलिग्रे मराठी शाळेचे स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश
Total Views: 535