बातम्या

मलिग्रे येथे वॉटर एटीएमचे शानदार उदघाट्न

Maligre water atm


By nisha patil - 2/6/2026 10:12:25 PM
Share This News:



**मलिग्रे येथे वॉटर एटीएमचे शानदार उदघाट्न*

**आजरा(हसन तकीलदार)*:- मलिग्रे ता. आजरा येथे वॉटर एटीएमचे उदघाट्न उत्साहात पार पडले. संयुक्त वाघाची तालीम मंडळाच्या संकल्पनेतून व मलिग्रे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सदर कार्यक्रम पार पडला.

एअरटेक प्रा.लि. कंपनीचे उद्योजक साईनाथ नेसरीकर यांच्या आर्थिक सहकार्याने साडेतीन लाख रुपये खर्च करून गावाला फिल्टर केलेले आर. ओ. चे थंडगार व साधे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले. उद्घाटन नाना नेसरीकर, सुशिला नेसरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.

स्वागत व प्रास्ताविक कॉ.संजय घाटगे यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना सरपंच गुरव म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वॉटर एटीएमसाठी बोअरवेल सुरू करून देण्यात आला आहे. शुद्ध पाण्याच्या माध्यमातून मंडळाने चांगली सोय केल्याने ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना मिळणार असून नेसरीकर कुटुंबियांकडून शुद्ध पाणी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष राऊ बुगडे यांनी किशोर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले असून याचा लाभ गावकऱ्यांना मिळणार आहे. यापुर्वीही मंदिराजवळ सौर दिवा बसविण्यात आला आहे. तसेच रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले.

माजी सरपंच अशोक शिंदे यांनी गुजरात राज्यातील यशस्वी उद्योजक साईनाथ नेसरीकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाला अथर्व वॉटर सेल्सचे प्रमुख ज्ञानेश्वर कांबळे, माजी सरपंच गजानन देशपांडे, उपसरपंच चाळू केंगारे, ग्रामसेवक धनाजी पाटील, आनंदा बुगडे, शंकर नेसरीकर, अनिल कागिनकर, आप्पाजी नेसरीकर, बाबू सावंत, सागर कांबळे, सुनील सावंत, अमर जोंधळे, सचिन सावंत, कल्पना बुगडे, सुनंदा बुगडे, शिवाजी नेसरीकर, उत्तम कागिनकर, शंकर बुगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संयुक्त तालीम मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी आभार मानले.


मलिग्रे येथे वॉटर एटीएमचे शानदार उदघाट्न
Total Views: 3