बातम्या

बालकांचे चांगलं संगोपन झाल्याने कुपोषण होणार नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Malnutrition will not occur if children are raised well


By nisha patil - 4/10/2025 3:56:21 PM
Share This News:



बालकांचे चांगलं संगोपन झाल्याने कुपोषण होणार नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

- एकात्मिक बाल विकास इमारत उद्घाटन

कागल/ प्रतिनिधीलहान बालकांचे चांगले संगोपन झाल्याने मुले कुपोषित होणार नाहीत. अंगणवाडी  आशा हे सर्वजण चांगले काम करतील असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  यांनी केले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प योजनाअंतर्गत, पंचायत समिती कागल येथे नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
 

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व प्रकल्प योजनेअंतर्गत इमारतीचे काम चांगले  झाले असल्याने सर्व अधिकारी वर्गाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. या इमारतीमध्ये एकात्मिक बाल विकास अधिकारी कक्ष, कर्मचारी यांना बसण्यासाठी कक्ष, मीटिंग हॉल, किचन आणि स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या नूतन इमारती मधून आशा वर्कर, अंगणवाडीचे सर्व कर्मचारी चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
    
 गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे म्हणाले,  या इमारतीमुळे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांची चांगली सोय होणार आहे . यामुळे कामात सुसूत्रता येणार आहे. यापूर्वी मी अनेक ठिकाणी काम केले आह. मात्र अशी इमारत कोठेही नाही. मंत्री असून मुश्रीफ यांच्यामुळे कागल तालुका सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे . 
   

यावेळी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी अंगणवाडी सेविका, मदतनीस या शिदोरी घेऊन उपस्थित होत्या. कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, बालविकास अधिकारी जयश्री नाईक, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद तारळकर आदींसह एकात्मिक बाल विकास विभागाचे अधिकारी वर्ग , कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


बालकांचे चांगलं संगोपन झाल्याने कुपोषण होणार नाही - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Total Views: 76