बातम्या

समतेच्या इतिहासात माणगावचे अजरामर स्थान – हसन मुश्रीफ

Mangaons immortal place in the history of equality


By nisha patil - 4/26/2025 12:23:49 AM
Share This News:



समतेच्या इतिहासात माणगावचे अजरामर स्थान – हसन मुश्रीफ

माणगाव (ता. हातकणंगले),  –"माणगाव ही समतेच्या चळवळीची क्रांतिकारी भूमी आहे. १९२० मध्ये येथे शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अस्पृश्य परिषद पार पडली होती, ज्यामुळे माणगावचे नाव समतेच्या इतिहासात अजरामर राहील," असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

माणगाव येथील डॉ. आंबेडकर यांच्या 'लंडन हाऊस' स्मारकाला राष्ट्रीय स्मारक दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या "गौरवशाली महाराष्ट्र – मंगल कलश यात्रा" दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी माणगाव येथे अभिवादन केले. या प्रसंगी सरपंच राजू मगदूम व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

मुश्रीफ यांनी २२ मार्च १९२० रोजीच्या परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांच्याबाबत व्यक्त केलेल्या गौरवोद्गारांचा उल्लेख केला आणि दलित समाजाने बाबासाहेबांचा मूलमंत्र – "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" – कायम जपावा, असे आवाहन केले.


समतेच्या इतिहासात माणगावचे अजरामर स्थान – हसन मुश्रीफ
Total Views: 137