बातम्या

फळांचा राजा आंबा आजऱ्याच्या बाजारात दाखल

Mango the king of fruits has entered the market in Ajya


By Administrator - 3/28/2026 6:05:44 PM
Share This News:



फळांचा राजा आंबा आजऱ्याच्या बाजारात दाखल
     

आजरा(हसन तकीलदार):-यंदा हवामान बदलामुळे देवगड हाफूसच्या उत्पादनात 40 ते 50 टक्क्यापर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्यास दर चढीनेच राहण्याची शक्यता असते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देवगडचा हाफूस दिमाखात दाखल झाला आहे. सद्या आजऱ्यात पंधरा म्हणजे सव्वा डझन आंब्यांचा दर 1300 ते 1500 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
       

वांझ मोहोर आणि अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असल्याचे आंबा उत्पादकाकडून सांगण्यात येत आहे. आवक कमी असल्याने प्रति डझन आणि पेटीचा दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा दिसत असला तरी हौशी आणि खवय्ये चढ्या दरानेसुद्धा खरेदी करताना दिसत आहेत. पाळेकरवाडी (देवगड)यासारख्या भागातून आंबा यायला सुरवात झाली आहे. चवीने अद्वितीय असल्याने देवगड हाफूसला खवय्याकडून पहिली पसंती मिळत आहे.
   

पुढे आंब्याची आवक वाढल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर आंब्यांचे दर खाली येण्याची शक्यता आहे. त्यावेळी सर्वसामान्य माणसे जास्त प्रमाणात खरेदी करतील असे मत आजऱ्याचे फळ व्यापारी इमामहुसेन खेडेकर ,समिर काकतिकर आणि जुबेर काकतिकर यांनी सांगितले.


फळांचा राजा आंबा आजऱ्याच्या बाजारात दाखल
Total Views: 248