बातम्या
शिवाजी विद्यापीठाच्या सर्वोच्च व्यवस्थापनात डॉ.मंजिरी मोरे यांची निवड...
By nisha patil - 4/24/2025 6:08:43 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या सर्वोच्च व्यवस्थापनात डॉ.मंजिरी मोरे यांची निवड...
तीन अत्यंत महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या ठरल्या पहिल्या महिला..
शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन मापदंड निर्माण करणाऱ्या आणि जागतिक स्तरावर कोल्हापूरचे नाव उज्वल करणाऱ्या डॉ. मंजिरी अजित मोरे यांची नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली असून शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे पद भूषवणारे त्या व्यक्ती ठरल्या आहेत.
जगभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या डॉ. मोरे यांना अमेरिकेचा "ग्रीन कॉलेज अवॉर्ड", सिंगापूर येथील "लोकमत ग्लोबल सखी पुरस्कार", दुबईच्या रेडिओ सिटीचा "एक्सेलन्स इन हायर एज्युकेशन" पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती संचालनालयातर्फे "आधुनिक सावित्री" हा सन्मान प्राप्त झाला आहे.शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य, विद्यापरिषद सदस्य, आणि आता व्यवस्थापन परिषदेवर निवड – अशी तीन अत्यंत महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या त्या शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. हा केवळ त्यांचा व्यक्तिगत सन्मान नसून, संपूर्ण शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरच्या सर्व शिक्षणप्रेमींना अभिमान वाटावा अशी बाब आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या सर्वोच्च व्यवस्थापनात डॉ.मंजिरी मोरे यांची निवड...
|