बातम्या
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला सुरुवात
By nisha patil - 10/9/2025 3:37:17 PM
Share This News:
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला सुरुवात
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. २ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मनोज जरांगे यांनी नुकतीच दोन दिवसांपूर्वी प्रमाणपत्र वाटपाला२ सुरुवात करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, सरकारने छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव, लातूर, हिंगोली, बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना सूचना देत प्रमाणपत्र प्रक्रियेला गती दिली आहे.
हैदराबाद गॅझेटिअर मधील नोंदींच्या आधारे चौकशी करण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांचा या समित्यांमध्ये समावेश आहे. समिती सदस्यांना प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.
यामुळे मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला सुरुवात
|