बातम्या
मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषण; मराठा समाजासाठी सरकारचा नवा जीआर
By nisha patil - 8/30/2025 3:35:58 PM
Share This News:
मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषण; मराठा समाजासाठी सरकारचा नवा जीआर
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने उशिरा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळविणे अधिक सुलभ होणार आहे. वंशावळ जुळविण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितींना ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती सरकारने दिली आहे. या निर्णयामुळे पात्र व्यक्तींना कायदेशीर तपासणीनंतर जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे, मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला नवा वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषण; मराठा समाजासाठी सरकारचा नवा जीआर
|