बातम्या
आजरा राईस मिल परिसरातील धोकादायक खड्ड्यांवरून मनसे विद्यार्थी सेनेचा प्रशासनाला इशारा
By nisha patil - 11/23/2025 10:25:06 PM
Share This News:
आजरा राईस मिल परिसरातील धोकादायक खड्ड्यांवरून मनसे विद्यार्थी सेनेचा प्रशासनाला इशारा
आजरा — राईस मिल परिसरातील रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आजरा शहराध्यक्ष यश सुतार यांनी प्रशासनाला लेखी निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यश सुतार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की रस्त्यावर तब्बल पाच मोठे खड्डे तयार झाले असून दररोज वाहनचालकांसह पादचाऱ्यांचे जीव धोक्यात येत आहेत. "निवडणुका असोत किंवा नसोत, नागरिकांची सुरक्षितता प्रथम असली पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने विलंब न करता हे खड्डे बुजवून सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी, अन्यथा मनसे विद्यार्थी सेना योग्य पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही यश सुतार यांनी दिला आहे.
नागरिकांमध्येही या समस्येबाबत असंतोष वाढत असून प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
आजरा राईस मिल परिसरातील धोकादायक खड्ड्यांवरून मनसे विद्यार्थी सेनेचा प्रशासनाला इशारा
|