बातम्या

कोल्हापुरात मनसेचा मेळावा संपन्न; राज ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारीचे आवाहन

Manse melava


By nisha patil - 11/4/2026 4:38:24 PM
Share This News:



कोल्हापुरात मनसेचा मेळावा संपन्न; राज ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारीचे आवाहन

माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्त नूतन संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार व नंदकुमार चिले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहातील राजश्री शाहू सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचा मेळावा उत्साहात पार पडला.

यावेळी संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले की, राज ठाकरे यांचा लवकरच कोल्हापूर दौरा होणार असून त्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्याने दर महिन्याला आपला कामाचा अहवाल ऑनलाइन स्वरूपात सादर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामात निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

नंदकुमार चिले यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यातील संघटनात्मक रचना अधिक सक्षम करून पक्षाचे ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे. समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून पक्षाचे विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, दौलत पाटील, नागेश चौगुले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापुरात मनसेचा मेळावा संपन्न; राज ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारीचे आवाहन
Total Views: 20