राजकीय
मनसे वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष संजय नाईक यांचे महालक्ष्मी दर्शन..
By nisha patil - 9/29/2025 8:33:32 PM
Share This News:
मनसे वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष संजय नाईक यांचे महालक्ष्मी दर्शन..
मनसेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक
कोल्हापूर (28 सप्टेंबर) – नवरात्र महोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष संजय नाईक यांनी आज कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात गाभाऱ्यातून दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी कोल्हापूर व जिल्ह्यातील सेनेकडून राबविण्यात आलेल्या आंदोलन व उपक्रमांचे कौतुक केले.
सेवाभावी उपक्रमांबद्दल कौतुक, जोमाने काम करण्याचे आवाहन नाईक यांनी यापुढेही वाहतूक सेनेचे कार्य जोमाने सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी पदाधिकारी अतुल भालकर व राज्य उपाध्यक्ष राजू जाधव उपस्थित होते.
मनसे वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष संजय नाईक यांचे महालक्ष्मी दर्शन..
|