राजकीय
मनसेचा ताराराणी आघाडीला जाहीर पाठिंबा
By nisha patil - 11/28/2025 10:50:19 PM
Share This News:
**मनसेचा ताराराणी आघाडीला जाहीर पाठिंबा*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा नगरपंचायतीची निवडणूक जवळ येईल तसे पाठिंब्यासाठी प्रत्येकजण गणितं घालत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुक्याच्या वतीने ताराराणी विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. ताराराणी आघाडीला मनसेच्या इंजनचे बळ मिळाले आहे.
मनसेचे आजरा तालुकाअध्यक्ष आनंदा घंटे पाठिंबा जाहीर करताना म्हणाले की, आजरा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले व सातत्याने आजरा शहराच्या विकासाचा ध्यास असणारे व नगरपंचायत स्थापनेपासून राजकारण बाजूला ठेऊन आजरा शहराच्या विकासाला प्राधान्य देणारे नेते व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकआण्णा चराटी व ताराराणीच्या सर्व नगरसेवक उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आहोत. त्याचप्रमाणे पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहोत.
यावेळी ऍड. सुशांत पवार(उपतालुकाध्यक्ष), सौ. सरिता सावंत (महिला आघाडी उपजिल्हाध्यक्षा), चंद्रकांत इंगळे, संतोष शिवगंड, वसंत घाटगे, सचिन मद्याळकर, यश सुतार आदिजण उपस्थित होते.
मनसेचा ताराराणी आघाडीला जाहीर पाठिंबा
|