बातम्या

मुलभूत विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी -मोहन मव्दाण्णा,

Many career opportunities for students in basic sciences


By nisha patil - 11/19/2025 6:01:06 PM
Share This News:



मुलभूत विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी -मोहन मव्दाण्णा,

कोल्हापूर दि. 19 :   विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान मंडळातर्फे “ संशोधनाकडे वळूया ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.  या व्याख्यानात बोलताना मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य्‍ व  विज्ञान लेखक मोहन मव्दाण्णा यांनी विद्यार्थ्यांना मुलभूत विज्ञानामध्ये सध्या जगभर सुरु असणारे संशोधन याबाबत पीपीटी व्दारे माहिती दिली. 

तसेच मुलभूत विज्ञानातील संशोधनाची गरज व त्यावर आधारित तंत्रज्ञान आणि त्यामुळे होणारा आर्थिक व सामाजिक विकास याबाबतही माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील करिअरबद्दल विचारलेल्या शंकाचे निरसन प्रमुख वक्ते लेखक मोहन मव्दाण्णा यांनी केले.

          याप्रसंगी मराठी विज्ञान परिषद, कोल्हापूरच्या अध्यक्षा डॉ अंजली साळवी व अमर भोसले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गीतांजली साळुंखे यांनी केले. आभार विज्ञान मंडळ समन्वयक डॉ अभिजीत पाटील यांनी मानले.  सुत्रसंचालन प्रा.   ए पी म्हात्रे यानी केले.  यावेळी ज्युनिअर सायन्स विभागप्रमुख प्रा. एम.आर.नवले, डॉ एम बी साळुंखे, कॅप्टन्‍ सुनिता भोसले, प्रा.एस.एस.जगताप व ज्युनिअर सायन्सचे प्राध्यापक व  विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


मुलभूत विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी -मोहन मव्दाण्णा,
Total Views: 28