शैक्षणिक
महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रियेत अनेक अडचणी; उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
By nisha patil - 4/11/2025 12:53:06 PM
Share This News:
मुंबई :- महाराष्ट्र पोलिस दलातील १७,४९४ पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र या भरती प्रक्रियेत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भरतीत पोलिस बँड्समन तसेच अनाथ प्रवर्गातील जागांविषयी स्पष्टता नसल्याने उमेदवारांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षणानुसार जागांचे तपशील स्पष्ट न केल्यामुळे उमेदवारांना अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भरती प्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वाशी आणि गोंदिया अशा सात ठिकाणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये सामाजिक आरक्षण आणि प्रवर्गनिहाय जागांची सविस्तर माहिती न दिल्याने उमेदवार गोंधळले आहेत.
विशेषत मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यात जागांविषयीची माहिती अपुरी असल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. तर इतर काही जिल्ह्यांमध्ये फक्त जागांची संख्या जाहीर केली असून, प्रवर्गनिहाय विभागणी करण्यात आलेली नाही.
या सर्व गोंधळामुळे उमेदवारांमध्ये निराशा आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आणि तत्काळ पूर्ण व्हावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रियेत अनेक अडचणी; उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
|