राजकीय
अशोकराव माने विरुद्ध राजू आवळे – मराठा समाजाची जमीन चर्चेत
By nisha patil - 2/9/2025 2:18:40 PM
Share This News:
अशोकराव माने विरुद्ध राजू आवळे – मराठा समाजाची जमीन चर्चेत
कोल्हापूर जिल्ह्यातील वाठर गावातील जमीन प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बालासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला तब्बल साडेसात एकर जमीन लीजवर देण्यात आली आहे.
मात्र, ही जमीन गावाची असून खोटे कागदपत्रे व डायरीतील फेरबदल करून ती देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात अनिश्चितकालीन उपोषणाचा कालावधी 18व्या दिवशी गेला असताना समाधानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली.
बैठकीदरम्यान आमदार अशोकराव माने व माजी आमदार राजू आवळे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.राजू आवळे यांनी थेट आमदार माने यांच्यावर मराठा समाजाची जमीन घेतल्याचा आरोप केला. आवळे म्हणाले, “आमदारांनी मराठा समाजाची जमीन घेतली. आता ही जमीन तुमच्या नातेवाइकांना देणार आहात का?” यावर अशोकराव माने आक्षेप घेत म्हणाले, “मी ती जमीन घेतलेली नाही. आम्ही गावाच्या बाजूने आहोत. हा विषय इथे काढायचा नाही.”
यावेळी ग्रामस्थ राजहंस भुजिंगे यांनीही आमदार माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “तुमच्या प्रचारासाठी आम्ही गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या. पण निवडून आल्यानंतर तुम्ही आमची दखल घेतली नाही. उपोषणाला भेट द्यायला वेळ नाही, पण गावात येऊन भजी खायला मात्र वेळ मिळतो.”बैठकीदरम्यान झालेल्या या घडामोडींमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
अशोकराव माने विरुद्ध राजू आवळे – मराठा समाजाची जमीन चर्चेत
|