शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
By Administrator - 1/28/2026 1:00:22 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
विविध उपक्रमांतर्गत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा नुकताच उत्साहात संपन्न झाला.याअंतर्गत माझा लेखन प्रवास, अभिवाचन स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा,लेखन कौशल्य कार्यशाळा, मराठी बोलूया, मराठी जाणून घेऊया यास विविध स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के. शानेदिवाण, मराठी विभाग प्रमुख डॉ.डी.के.वळवी व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे प्रोत्साहन मिळाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी माझा लेखन प्रवास या विषयावर व्याख्यान दिले. डॉ.डी.के.वळवी, डॉ. पल्लवी कोडक, डॉ.रचना माने यांनी या उपक्रमांचे संयोजन केले .महाविद्यालयातील सहाशे हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साह साजरा केला.
शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
|