बातम्या
शहाजी महाविद्यालयात मराठी वाडमय मंडळाचे उद्घाटन
By nisha patil - 7/16/2025 11:58:18 AM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात मराठी वाडमय मंडळाचे उद्घाटन
वैश्विक मूल्यातून जीवन सुंदर होते -प्रा. डॉ.स्वप्निल बुचडे
कोल्हापूर:वैश्विक मूल्यातून जीवन सुंदर होते असे प्रतिपादन श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय कापशीचे प्राध्यापक डॉ. स्वप्निल बुचडे यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभाग आणि आयक्यूएसी आयोजित मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हे जीवन सुंदर आहे असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी होते. यावेळी त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
डॉ. स्वप्निल बुचडे म्हणले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपल्या भविष्याचा वेध घेताना चांगल्या ग्रंथांचा आणि ग्रंथालयाचा आधार घ्यावा.यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जगातील मोठी माणसंही ग्रंथाच्या सहवासाने मोठी झालेली आहेत. त्यांचं जीवन सुंदर आहे. हे जीवन आणखी सुंदर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत.
स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. डी. के. वळवी यांनी केले. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रचना माने यांनी आभार मानले. डॉ. पल्लवी कोडक यांनी संयोजन केले. यावेळी ओळख माय मराठीच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. या फलकावरती रोज नवीन शब्दांची ओळख, मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार, शब्द व शब्दाचे अर्थ लिहिण्यात येणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात मराठी वाडमय मंडळाचे उद्घाटन
|