बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
By Administrator - 1/30/2026 2:48:35 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
कोल्हापूर, दि. 30 : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न झाला. या मराठी भाषा संवर्धन पंधरवडयामध्ये व्याख्याने, निबंध, वक्तृत्व् , शुध्दलेखन व अभिवाचन स्पर्धा तसेच शासकीय मुद्रणालय भेट असे भरगच्च उपक्रम राबविण्यात आले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे उदघाटन मा.प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात यांच्या हस्ते झाले. बोलीचा जागर या विषयावर मराठी विभागप्रमुख प्रा डॉ. एकनाथ आळवेकर यांनी मार्गदर्शन केले तर मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या विषयावर डॉ. प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. शासकीय मुद्रणालयातील भेटीवेळी तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मुद्रणालयाच्या कामकाजाची व त्यातील रोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. या पंधरवडयात राबविण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व् , शुध्दलेखन व अभिवाचन स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. या पंधरवडयाच्या समारोप प्रसंगी
प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर पंधरवडयाचे संयोजन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर, प्रा. डॉ. प्रदीप पाटील, प्रा. रोहिणी रेळेकर यांनी केले.
विवेकानंद विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्नकॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
|