बातम्या
मराठमोळ्या शिवमने मोडला नीरज चोप्राचा विक्रम! 84.31 मीटर अंतरावर भालाफेक
By Administrator - 9/13/2025 11:20:32 AM
Share This News:
मराठमोळ्या शिवमने मोडला नीरज चोप्राचा विक्रम! 84.31 मीटर अंतरावर भालाफेक
74व्या इंटर सर्व्हिसेस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये मराठमोळ्या खेळाडू शिवमने भालाफेक स्पर्धेत 84.31 मीटर अंतरावर भाला फेकत नवा इतिहास रचला. या अविश्वसनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या आधी 2018 साली ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने 83.80 मीटरवर विक्रम केला होता. आता शिवमने हा विक्रम मागे टाकत नवा उच्चांक नोंदवला आहे.
मात्र, ही स्पर्धा अधिकृत वर्ल्ड अॅथलेटिक्स मान्यतेची नसल्याने शिवमची ही नोंद जागतिक विक्रम म्हणून मान्य होणार नाही. तरीदेखील, शिवमच्या या भक्कम प्रदर्शनामुळे त्याचं नाव क्रीडा विश्वात मोठं ठरलं आहे.
खेळप्रेमींनी सोशल मीडियावरून शिवमवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
मराठमोळ्या शिवमने मोडला नीरज चोप्राचा विक्रम! 84.31 मीटर अंतरावर भालाफेक
|