बातम्या
गिरीश फोंडे निलंबनाविरोधात कोल्हापुरात मोर्चा, शिक्षकांचा संपाचा इशारा
By nisha patil - 4/17/2025 11:02:17 PM
Share This News:
गिरीश फोंडे निलंबनाविरोधात कोल्हापुरात मोर्चा, शिक्षकांचा संपाचा इशारा
कोल्हापूर – सहायक शिक्षक आणि समाजसेवक गिरीश फोंडे यांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात विविध संघटनांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या कारवाईविरोधात आवाज उठवणाऱ्या संघटनांमध्ये इंडिया आघाडी, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, शैक्षणिक व्यासपीठ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना आदींचा समावेश होता.
मोर्चात सहभागी शिक्षक व कार्यकर्त्यांनी "शक्तीपीठ महामार्ग रद्द करा", "गिरीश फोंडे पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत", "आंदोलन आमचं अधिकार" अशा घोषणा दिल्या. मोर्चानंतर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केलं. निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास शिक्षक संपावर जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपत बापू पाटील, विजय देवणे, सचिन चव्हाण आदी मान्यवरांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गिरीश फोंडे यांना 4 एप्रिल रोजी शक्तीपीठ महामार्ग व कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा दिल्याने निलंबित करण्यात आलं होतं. ही कारवाई दडपशाही असल्याचा आरोप करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
गिरीश फोंडे निलंबनाविरोधात कोल्हापुरात मोर्चा, शिक्षकांचा संपाचा इशारा
|