मनोरंजन
"लग्न ही मोठी जोखीम आहे; मानसिक शांतता माझी प्राथमिकता" — प्राजक्ता माळीचं स्पष्ट मत
By nisha patil - 4/18/2025 4:22:02 PM
Share This News:
"लग्न ही मोठी जोखीम आहे; मानसिक शांतता माझी प्राथमिकता" — प्राजक्ता माळीचं स्पष्ट मत
मराठीतील आघाडीची अभिनेत्री आणि चाहत्यांची लाडकी प्राजक्ता माळी पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आली आहे. वैयक्तिक आयुष्यावर नेहमीच मोकळेपणाने बोलणारी प्राजक्ता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाबाबतचे तिचे स्पष्ट विचार मांडताना दिसली.
३५ वर्षीय प्राजक्ता माळी सध्या सिंगल आहे. काही दिवसांपूर्वी तिने आईला लग्नासाठी मुलगा शोधायला सांगितलं होतं, हे विधान गाजलं होतं. मात्र, 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तिने लग्नाबाबतचा तिचा दृष्टिकोन अतिशय प्रामाणिकपणे मांडला.
"डोक्याची मंडई होणार असेल तर लग्न नको. कारण मानसिक शांतता हिच माझी आयुष्यभरासाठी प्राथमिकता आहे. एक जोडीदार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो — तुमचं रोजचं जगणं, भविष्य, आर्थिक गणितं, मानसिक आणि शारीरिक आरोग्य. लग्न ही खूप मोठी जोखीम आहे," असं ती म्हणाली.
प्राजक्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून, आपल्या सुंदर फोटोंमधून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधते. तिच्या कामाबद्दलचे अपडेट्स आणि वैयक्तिक मतं ती खुलेपणाने शेअर करत असते.
"लग्न ही मोठी जोखीम आहे; मानसिक शांतता माझी प्राथमिकता" — प्राजक्ता माळीचं स्पष्ट मत
|