विशेष बातम्या
गिझरमधून गॅस गळतीचा भीषण स्फोट — वृद्ध दांपत्य गंभीर जखमी; संपूर्ण घराला भेगा, परिसर हादरला!
By nisha patil - 10/30/2025 5:24:17 PM
Share This News:
गिझरमधून गॅस गळतीचा भीषण स्फोट — वृद्ध दांपत्य गंभीर जखमी; संपूर्ण घराला भेगा, परिसर हादरला!
सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे गुरुवारी पहाटे गिझरला जोडलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले. अण्णासाहेब आणि मनीषा अंदरघिस्के असे जखमींची नावे असून, दोघांनाही सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोट इतका प्रचंड होता की घराच्या भिंतींना भेगा पडल्या, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल आणि गॅस कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गिझरमधून गॅस गळतीचा भीषण स्फोट — वृद्ध दांपत्य गंभीर जखमी; संपूर्ण घराला भेगा, परिसर हादरला!
|