ताज्या बातम्या
आजऱ्यात कारझोन गॅरेजला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
By nisha patil - 12/27/2025 11:43:15 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- आजरा शहरातील आंबोली रोडवर असलेल्या कारझोन गॅरेजला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना आज (27 डिसेंबर) पहाटे घडली. भाई-भाई थिएटर आणि आजरा पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या या गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत गॅरेजमधील सर्व फोरव्हीलर वाहने जळून खाक झाली.
या आगीचा फटका गॅरेजच्या वरच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल पंचतारा, चायनीज सेंटर, टायर दुकान, अंडी विक्री दुकान तसेच प्लम्बिंग मटेरियलच्या दुकानांना बसला असून ही सर्व दुकाने आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही आग सकाळी सुमारे चार ते साडेचारच्या सुमारास लागल्याचे सांगण्यात येत असून, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि नुकसान मोठ्या प्रमाणात झाले, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
आजऱ्यात कारझोन गॅरेजला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
|