ताज्या बातम्या

कोल्हापुरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरसंसार उद्ध्वस्त, पाळीव पोपट जळून खाक

Massive gas cylinder explosion in Kolhapur House destroyed  pet parrot burnt to death


By nisha patil - 6/1/2026 1:47:42 PM
Share This News:



कोल्हापूर शहरातील बाईच्या पुतळ्याजवळ, नवश्या मारुतीच्या मागील बाजूस असलेल्या एका घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे.
सदर आग सकाळच्या सुमारास लागली. अवघ्या २० मिनिटांतच या आगीची झळ दोन ते तीन घरांपर्यंत पोहोचली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे, मात्र या घरातीलच पाळीव पोपट जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना निदर्शनास आली आहे. आगीत फर्निचर, कपडे, भांडी तसेच दैनंदिन वापराचे साहित्य जळून नष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र इथल्या लोकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या घटनेमुळे संबंधित कुटुंबाचं मोठं आर्थिक आणि भावनिक नुकसान झालं असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.


कोल्हापुरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरसंसार उद्ध्वस्त, पाळीव पोपट जळून खाक
Total Views: 146