बातम्या
अलमट्टी धरणाच्या उंची वाढ विरोधात रविवारी चक्का जाम
By nisha patil - 5/16/2025 3:10:20 PM
Share This News:
अलमट्टी धरणाच्या उंची वाढ विरोधात रविवारी चक्का जाम
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भयावह पूरपरिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंचीवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने "चक्काजाम आंदोलन" पुकारण्यात आलंय.रविवार 18 मेला कोल्हापूर सांगली रोडवरील अंकली पूल येथे हे आंदोलन होणार आहे.
"पूरग्रस्त होण्यापासून आपल्या गाव, शेत आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी, हजारोंच्या संख्येने या चक्काजाम आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा!"असं आवाहन अलमट्टी उंचीवाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीने केलंय.
अलमट्टी धरणाच्या उंची वाढ विरोधात रविवारी चक्का जाम
|