बातम्या

मातोंड येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण...

Matond


By nisha patil - 6/18/2026 5:01:48 PM
Share This News:



धर्मजागृतीसोबत निसर्गसंवर्धनाचा संदेश

मातोंड येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण...

सिंधुदुर्ग ✒️शुभम गवस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाला प्रतिसाद देत वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित या उपक्रमातून धर्मसंवर्धनासोबतच निसर्गसंवर्धनाचा आगळावेगळा संदेश देण्यात आला.

जिल्हाभरातील विविध मंडलांमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येत असून, ‘आईसाठी एक झाड लावा’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हिंदू संमेलनाच्या निमित्ताने धर्मजागृतीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मातोंडच्या सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, सोशल मीडिया प्रमुख श्रीकृष्ण (राजू) परब, पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब आणि राहुल प्रभू, ग्रामपंचायत सदस्या सौ. किशोरी परब, सौ. सुजाता सावंत, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबुराव खवणेकर तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते किशोर परब, अनिल परब, श्रीकांत परब, संतोष सावंत, प्रदीप जबडे, वसंत खाजणेकर, संतोष परब आणि अविनाश परब आदी उपस्थित होते.


मातोंड येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण...
Total Views: 16