बातम्या
श्री गणेशा आरोग्याचामोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी मार्फत आरोग्य शिबीर
By nisha patil - 8/9/2025 11:04:37 AM
Share This News:
"श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी मार्फत आरोग्य शिबीर...
आजरा(हसन तकीलदार): तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या मार्फत “श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमेअंतर्गत विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरांमध्ये नागरिकांना आधार व गोल्डन कार्ड नोंदणी, नेत्रदान व अवयव दान जनजागृती, तसेच कुष्ठरोग, क्षयरोग, जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून सल्ला व उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमात शिरसंगी, दाभिल, कासार कांडगाव, पारेवाडी, वेळवटी, गवसे व पोळगाव उपकेंद्रांचा सक्रिय सहभाग राहिला. शिबिरांच्या आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका व आरोग्य सेवक/सेविका यांनी विशेष मेहनत घेतली.
या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढून निरोगी समाजाची दिशा ठळकपणे अधोरेखित झाली.
श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी मार्फत आरोग्य शिबीर
|