बातम्या

गोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांना न्याय मिळू दे! आ. सतेज पाटलांचे हालसिद्धनाथाला साकडे!

May justice be served to the 5 5 lakh milk producers


By nisha patil - 10/24/2026 2:15:43 PM
Share This News:



गोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांना न्याय मिळू दे! आ. सतेज पाटलांचे हालसिद्धनाथाला साकडे!

गोकुळ दूध संघाच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे, तसेच संघाचे नाव देशभर उंचावू दे, असे साकडे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हालसिद्धनाथाच्या चरणी घातले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत १३ संचालक निवडून आल्यानंतर शुक्रवारी नूतन संचालक मंडळाने आप्पाचीवाडी येथील प्रसिद्ध हालसिद्धनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ठरावधारक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

गोकुळच्या माध्यमातून जे-जे चांगले करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. गोकुळचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. ठरावधारक आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार सतेज पाटील आणि नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत चुयेकर, शशिकांत खोत यांच्यासह नूतन संचालक आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना कितपत न्याय मिळतो आणि संघाची वाटचाल कशी होते, याकडे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.


गोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांना न्याय मिळू दे! आ. सतेज पाटलांचे हालसिद्धनाथाला साकडे!
Total Views: 34