बातम्या
माझं गाव - आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा व टी.बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
By nisha patil - 4/30/2026 10:47:08 PM
Share This News:
*माझं गाव - आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा व टी.बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न**
**आजरा (हसन तकीलदार)*:-आरोग्य विभाग, पंचायत समिती आजरा यांचे मार्फत आज दि.३०/०४/२०२६ रोजी तहसिलदार कार्यालय आजरा येथील सभागृहात " माझं गाव - आरोग्य संपन्न गाव " अभियान कार्यशाळा व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत टी.बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री गाडे (सभापती पं.स. आजरा ) होत्या. सदर कार्यक्रमांस सौ. यशोदा पोवार (उपसभापती पं.स. आजरा),सुधीर देसाई (जि.प. सदस्य), शिरीष देसाई( जि.प. सदस्य), विकास चोथे (पं.स. सदस्य), समीर पारधे (पं.स. सदस्य),समीर माने (तहसिलदार आजरा),सुभाष सावंत( गट विकास अधिकारी), डॉ. रविंद्र गुरव (तालुका आरोग्य अधिकारी पं.स. आजरा), प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, आशा गट प्रवर्तक आदिजण उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासना मार्फत राबविणेत येत असलेल्या " माझं गाव - आरोग्य संपन्न गाव " या अभियानाची माहिती, अभियानाचे ध्येय, आरोग्य विषयक बाबी, कुटुंब नियोजन साधनांचा वापर, वैशिष्टे, निकष, बक्षिसे, मेळावे, कालावधी, अभियानाचे स्तर / टप्पे इ. विषयक माहिती देवून मार्गदर्शन करणेत आले. तसेच सदर अभियानाची जनजागृती करणेत आली. सदरचे अभियान दि.०१/०४/२०२६ ते दि.३१/०३/२०२७ या कालावधीत राबविणेत येणार आहे. तसेच आजरा तालुक्यातील एकूण ३७ ग्रामपंचायती टी.बी. मुक्त झालेल्या आहेत. त्यामध्ये सुवर्ण-०४ ग्राम पंचायत , रौप्य-१५ ग्रामपंचायत , कास्य- १८ ग्रामपंचायत अशा एकूण ३७ ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र व महात्मा गांधी यांचा पुतळा मान्यवरांच्या हस्ते वितरीत करणेत आला. स्वागत श्रीमती मनिषा भांडकोळी, (BNO) यांनी केले. कार्यशाळेची माहिती डॉ. रविंद्र गुरव, (तालुका आरोग्य अधिकारी )यांनी दिली. आभार कौस्तुभ पाटील, (आरोग्य सेवक)यांनी मानले
माझं गाव - आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा व टी.बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
|