बातम्या

नवरात्रोत्सवात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना – पोलीस अधीक्षकांशी चर्चा

Measures to avoid traffic jams during Navratri festival

By nisha patil - 9/25/2025 1:03:41 PM
Share This News:

नवरात्रोत्सवात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना – पोलीस अधीक्षकांशी चर्चा

कोल्हापूर : नवरात्र काळात कोल्हापुरात भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

या बैठकीत शहरातील ट्रॅफिक यंत्रणा सुरळीत राबवणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून शहर सुरक्षित करणे या दोन महत्त्वाच्या विषयांवर भर देण्यात आला.

शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी ठरली असून सणासुदीच्या काळात पोलिसांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

नवरात्रोत्सवात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना – पोलीस अधीक्षकांशी चर्चा
Total Views: 62