राजकीय
मंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
By nisha patil - 5/26/2026 5:21:30 PM
Share This News:
मंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
बुधवार, 27 मे रोजी सकाळी १०.१० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागलकडे प्रयाण
सकाळी १०.३० वाजता कागल येथे आगमन व राखीव. राखीव-विविध बैठकांना उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
गुरुवार २८ मे रोजी बकरी ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी राखीव.
शुक्रवार २९ मे रोजी सकाळी ७ वाजता राखीव - सर्व नागरिकांच्यासाठी गाठीभेटी (स्थळ-निवासस्थान, कागल). सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर सीपीआर येथे विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-सीपीआर, कोल्हापूर). सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार ३० मे रोजी सकाळी ७ वाजता राखीव - सर्व नागरिकांच्यासाठी गाठीभेटी (स्थळ-निवासस्थान, कागल). सकाळी १० वाजता सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना (एआय), येथे शेत शिवार पाहणी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-कागल). दुपारी १ ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत राखीव, सायंकाळी ४ वाजता. के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर बोर्ड बैठकीस उपस्थिती. (स्थळ- कोल्हापूर). सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार ३१ मे रोजी सकाळी ७ वाजता राखीव - सर्व नागरिकांच्यासाठी गाठीभेटी (स्थळ-निवासस्थान, कागल). सकाळी ११ वाजता मुळीक गुरुजी रा. भादवण, ता. आजरा यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- भादवण, ता. आजरा). दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी ५ वाजता नेताजी पालकर व्यायामशाळा, गडहिंग्लज वतीने कोल्हापूर जिल्हयात प्रथम महिलांची टर्फवरील क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती .सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
सोमवार १ जून रोजी सकाळी ७ वाजता राखीव - सर्व नागरिकांच्यासाठी गाठीभेटी (स्थळ-निवासस्थान, कागल). दुपारी १ वाजता कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर). रात्री ८.५० वाजता कोल्हापूर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
मंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
|